लाचखोर वासवानी नासुप्रमध्ये परतणार

By Admin | Updated: May 30, 2014 01:10 IST2014-05-30T01:10:23+5:302014-05-30T01:10:23+5:30

लाच घेतांना रंगहात पकडल्या गेलेला नागपूर सुधार प्रन्यासचा (नासुप्र) निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी पुन्हा नासुप्रमध्ये परतणार आहे. विश्‍वस्त मंडळाने तसा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

Bachchor Vaswani will return to Nasuput | लाचखोर वासवानी नासुप्रमध्ये परतणार

लाचखोर वासवानी नासुप्रमध्ये परतणार

विश्‍वस्त मंडळाचे धक्कादायक शिक्कामोर्तब :   दोन महिन्यांनी होणार सेवानवृत्त
नागपूर : लाच घेतांना रंगहात पकडल्या गेलेला नागपूर सुधार प्रन्यासचा (नासुप्र) निलंबित  अधीक्षक अभियंता नानक वासवानी पुन्हा नासुप्रमध्ये परतणार आहे. विश्‍वस्त मंडळाने तसा  धक्कादायक निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत विश्‍वस्तांनी वासवानीला कुठलेही पद  न देता नासुप्रमध्ये रुजू करुन घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. लाचखोर अधिकार्‍यासाठी  नासुप्रचे विश्‍वस्त सरसावल्याने नासुप्रच्या वतरुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे येत्या दोन महिन्यात वासवानी सेवानवृत्त होणार आहे. त्याला वेतन व सर्व प्रकारचा  लाभ मिळवून देण्यासाठी विश्‍वस्तांनी हे पाऊल उचलल्याचे बालले जात आहे. २00७ मध्ये  वासवानीला लाच घेण्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. निलंबनाच्या कालावधीत  त्यांना ७५ टक्के वेतन मिळत होते. आता नासुप्रच्या सर्व विश्‍वस्तांनी एकत्र येवून वासवानीला परत  आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, आर्थिक  अनियमिततेच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकार्‍याला ७५ टक्के  वेतन देण्यात येत असेल तर त्याच्याकडून कार्यालयीन कामेही काढून घ्यावी. गेल्या ७ वर्षापासून  वासवानी निलंबित आहे.
१९८४ मध्ये वासवानी नासुप्रमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले होते. २00१ मध्ये  वासवानीला कार्यकारी अभियंता पदावरून अधीक्षक अभियंता पदावर अस्थायी पदोन्नती देण्यात  आली होती. तेव्हा वासवानीची नासुप्रमध्ये चांगलीच चलती होती. त्याच्या मंजूरीशिवाय कुठलेही  काम होत नव्हते. वासवानी लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर तपासात अनेक खुलासे  झाले. अनेक प्रकरणाला दाबण्याचाही प्रयत्न झाला. लाचलूचपत विभागाने १८ जानेवारी २00७  रोजी लाच घेताना वासवानीला रंगेहाथ अटक केले होते. त्याचदिवशी नासुप्रने त्यांना निलंबित केले  होते. २00९ मध्ये वासवानीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याला मंजूरी दिली  होती.  पोलीसांनी वासवानीच्या घराची चौकशी केली असता, एलआयसी ऐजंट असलेला त्याचा  मुलगा हितेश याने ११0 पॉसिलीच्या माध्यमातून ११.0१ कोटीचा व्यवसाय केला आहे. त्याला  कमिशनच्या स्वरुपात २0 लाख ७९ हजार ४३८ रुपये मिळाले होते. पोलीसांनी वासवानीच्या  मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)
 

Web Title: Bachchor Vaswani will return to Nasuput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.