३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार - बबनराव लोणीकर
By Admin | Updated: June 30, 2016 15:16 IST2016-06-30T15:16:29+5:302016-06-30T15:16:52+5:30
राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार - बबनराव लोणीकर
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ३० - समृध्दीचा मार्ग स्वच्छतेच्या वाटेवरुन जातो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पूढे नेण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारक-यांनी साºया देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पंढरपूर नगरपारिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.
लोणीकर म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो वारकरी-भाविक येतात. या वारक-यांनी समाजाला नेहमी समता, बंधुता, सहिष्णुतेचे संदेश दिले आहेत. आता वारक-यांनी पंढरपुरातून स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशभर न्यावा व तेथे रुजवावा. पंढरपूरच्या यात्रेसाठी राज्य शासनाकडून २ कोटी रुपये दिले जात आहे परंतु यापूढे आणखी निधी देण्याचा प्रयत्न असेल. या माध्यमातून स्वच्छतेची कामे चांगल्या प्रकारे होतील. केवळा राज्य शासनाच्या प्रयत्ननातून पंढरपुरात स्वच्छता होणार नाही, त्यासाठी शहरवासीयांनी पंढरपूर स्वच्छतेसाठी आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे असेही लोणीकर म्हणाले.