शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

शेतकऱ्यांवर अवकाळ, राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:33 IST

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाऊस व गारांमुळे ऊस, केळी,पपई, मका व तूर या  पिकांना फटका बसला आहे. विदर्भात संत्रा कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. या पावसाने खरीपातील पिकांची हानी केली असली तरी  रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी अशा काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. 

मराठवाड्यात १०७ मंडळांत अतिवृष्टी- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला रविवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. विभागात ४०.४ मि.मी म्हणजेच, दीड इंच पावसाची नोंद एकाच रात्रीत झाली. १०७ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर २३ लहान व मोठी ९ जनावरे दगावली. जालना ७०.७, परभणी ६५ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ६५.८ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगावातील राजू जायभाये (वय ३२) याचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

कपाशी भिजली, तूर निजलीअकोला : अमरावती विभागात एकूण १८५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू व ५३ घरांची पडझड झाली आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. रविवारी मध्यरात्रीपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडासह रात्रभर पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र अपवाद वगळता तुरळक पावसाची हजेरी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान आहे. संत्र्याला झटका, तुरीला फटका हा पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरत असला तरी वेचणीला आलेला कापूस, तूर व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे - भोर, आंबेगावमध्ये भाताचे नुकसानपुणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून खेड, जुन्नर, आंबेगाव, भोर या चार तालुक्यांमध्ये पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भोर आणि आंबेगाव तालुक्यात भाताची कापणी सुरू आहे. द्राक्षे, डाळिंब, धने, मेथी, टोमॅटो, कांदा रोपे, मिरची, पालेभाज्या, गहू, कांदा, हरभरा, पपई, मका, फ्लॉवर, कोबी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खान्देशात वीज पडून दोघांचा मृत्यूजळगाव/नाशिक : खान्देशातील जळगाव, नंदुबार धुळे जिल्ह्यात रविवारी रात्रभर जोरदार बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले तिन्ही जिल्ह्यांत  २८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.   नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा मृत्यू झाला. मका झोपला, कांदा काळा पडलाअहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे शेतात असलेला मका झोपला, लाल कांद्याचेही नुकसान झाले. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने टोकडे गावात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस