शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा अजब कारभार :मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत प्रचंड घोळ

By यदू जोशी | Updated: December 18, 2017 02:48 IST

राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा आधीच प्रचंड घोळ घालून ठेवलेला असताना, आता शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्यातील महाविद्यालयांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातून काढून ती महाविद्यालयांच्या बँक खात्यात जमा करावी, असा अजब आदेश काढला आहे.

यदु जोशी नागपूर : राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा आधीच प्रचंड घोळ घालून ठेवलेला असताना, आता शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्यातील महाविद्यालयांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातून काढून ती महाविद्यालयांच्या बँक खात्यात जमा करावी, असा अजब आदेश काढला आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक आणि विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सुमारे २१ लाख विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याची आणि महाविद्यालयांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्काची कुठलीही रक्कम यंदा अदा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या या शिष्यवृत्तीवर कोणत्याही आमदाराने विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात आवाज उठवलेला नाही.सरकार म्हणते की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करा. याचा अर्थ महाविद्यालयांना मिळावयाची रक्कमही आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे आणि तिथून ती महाविद्यालयांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ज्या अधिका-यांनी/सचिवांनी हा अफलातून आदेश काढला, त्याने अक्कल गहाण ठेवली होती का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विद्यार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर त्यातील निर्वाह भत्ता वगळता इतर रक्कम (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क) संबंधित संस्थेच्या खात्यात कशी जमा करावी, या बाबत कोणतेही स्पष्ट दिशानिर्देश नाहीत. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास, शिक्षण विभाग आदी सात विभागांचा शिष्यवृत्ती वाटपाशी संबंध येतो. या विभागांनी शिष्यवृत्ती वाटपाबाबत गेल्या आठ दिवसांत आदेश काढले आहेत. विद्यार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर ती त्याची होईल आणि उद्या त्या विद्यार्थ्याने सर्व रक्कम खर्च केली तर शिक्षण संस्थांना देण्यासाठी पैसा कुठून द्यायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून ती महाविद्यालयाच्या बँक खात्यात टाकण्यासाठीची कोणतीही प्रणाली सध्या कोणत्याही विभागाकडे उपलब्ध नाही. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी विविध सरकारी लाभ आॅनलाईन देण्याची भूमिका घेतली असताना प्रगत महाराष्ट्रात शिष्यवृत्ती ‘मॅन्युअली’ देण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थी