शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

पुढील वर्षापासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणा-यांनाही पुरस्कार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:47 AM

शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.

मुंबई : शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाºयांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनी विविध साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी विनोद तावडे बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख उपस्थित होते.यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना, श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशन यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात आला. राम नाईक यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ दर्जेदार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध साहित्य प्रकारांतील ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. राहुल कोसंबी, ल.म. कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचाही सन्मान करण्यात आला.व्यापक प्रमाणात साजरा करणार-भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. येत्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करून मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करू. पहिली ते दहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात मराठी सक्तीचे करण्याच्या सूचना अभ्यासक्रम मंडळाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्रीमी मराठीत लिहिलेल्या ‘चरैवैती चरैवैती’ या पुस्तकाचा सहा भाषांमध्ये अनुवाद होत आहे. २६ मार्च रोजी संस्कृत भाषेतील अनुवादित पुस्तकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चरैवैती-चरैवैती’ या शब्दाचा अर्थ ‘चालत राहा, चालत राहा’ असा असून याप्रमाणे मी माझा लेखन प्रवास सुरू ठेवला आहे. - राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे