शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

High Court: ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती टाळणे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखेच! उच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:41 IST

उच्च न्यायालयाचे ताशेरे; १० लाख जप्त करून याचिकाही फेटाळली; वैधानिक पदांवरील व्यक्तींतील अविश्वास, हे महाराष्ट्राचे दुर्दैव.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानपरिषदेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड  झालेली नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात नाही का?, असा सवाल उच्च न्यायालयाने भाजप आमदार गिरीश महाजन यांना केला. लोकशाही इतकी ठिसूळ नाही, असे म्हणत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्य सरकारने केलेल्या नियमबदलाला आव्हान देणारी भाजप नेते गिरीश महाजन व जनक व्यास यांची याचिका फेटाळली. 

विधानसभा अध्यक्ष  निवडीच्या नियमांत बदल केल्याने लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, त्यावर न्यायालयाने चांगलेच कान उपटले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आम्ही वाचत असतो. त्यावरून हे चित्र स्पष्ट होते की, वैधानिक पदांवर बसलेल्या दोन व्यक्तींचा (राज्यपाल व मुख्यमंत्री) एकमेकांवर विश्वास नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सकारात्मकरीत्या पुढे जाताना दिसत नाही. 

या दोन्ही व्यक्तींनी एकत्र बसून आपापसातील मतभेद, वाद मिटवायला हवेत, असे निरीक्षण मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बुधवारी नोंदविले. गिरीश महाजन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, तर जनक व्यास यांच्या वतीने सुभाष झा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. 

भरडले कोण जाते?  ‘आम्ही सर्व वाचतो... राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात एकमत नाही, असा विचार आम्ही सर्व करतो; पण त्यात कोण भरडले जात आहे? राज्यपालांच्या निर्णयावर विश्वास दाखवला पाहिजे. तर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांना राज्य चालवायचे आहे. हे दोघेही चुकीचे आहेत, असे आम्हाला म्हणायचे नाही,’ असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

वेळ वाया घालवू नका!n या याचिकांवर सुमारे अडीच तास न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेरीस मुख्य न्या. दत्ता यांनी याचिकाकर्त्यांना न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवू नका, असे बजावले. n राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीबाबत केलेल्या नियमबदलामुळे नागरिकांना असलेल्या ‘कायद्यासमोर समानते’च्या तत्त्वाचा भंग होत नाही. या नियमबदलामुळे सामान्य नागरिकांवर कसा परिणाम होणार आहे, हे दाखवण्यासाठी याचिकादारांना प्रयत्न करावे लागतील. n विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत, हे जाणण्यासाठी लोक तेवढे उत्सुक नाहीत. जा आणि लोकांना विचारा की लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? या कोर्टरूममधील उपस्थितांपैकी किती लोकांना माहीत आहे ते विचारा...’ असे न्यायालयाने म्हटले. 

लोकशाही इतकी ठिसूळ आहे का?

  • ऑगस्ट २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने राज्यपालांना १२ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. 
  • मात्र, राज्यपालांनी अद्याप त्यावर काहीच निर्णय घेतला नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘हे घटनात्मक न्यायालय आहे. आम्हाला कशी वागणूक मिळते? आम्ही ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल (याचिकेवर) दिला. 
  • आता आठ महिने उलटले तरी काहीही झाले नाही. लोकशाहीचा गळा घोटला जाईल असा युक्तिवाद करत होता; पण राज्यपालांनी १२ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती न केल्याने लोकशाहीचा गळा घोटला गेला नाही का? 
  • या प्रकरणापेक्षा ते प्रकरण अधिक गंभीर नाही का? आपली लोकशाही इतकी ठिसूळ नाही. तुमच्यातले (राज्यपाल व मुख्यमंत्री) मतभेद मिटवा. 
  • तुमच्यातील वादामुळे राज्य पुढे जात नाही,’ अशी टिप्पणी मुख्य न्या. दत्ता यांनी केली.

 

अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने याचिका फेटाळली. तसेच गिरीश महाजन यांनी याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाच्या निबंधकांकडे अनामत रक्कम म्हणून जमा केलेले १० लाख, तर व्यास यांचे २ लाख रुपयेही न्यायालयाने जप्त केले.

भाजपच्या १२ आमदारांच्या वर्षभरासाठी केलेल्या निलंबनावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वर्षभरासाठी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. हा मनमानी कारभार आहे.’     

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनHigh Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार