आनंददायी गणोशोत्सवासाठी खड्डे टाळा, रस्ते वाचवा
By Admin | Updated: August 22, 2014 23:50 IST2014-08-22T23:50:33+5:302014-08-22T23:50:33+5:30
गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत.

आनंददायी गणोशोत्सवासाठी खड्डे टाळा, रस्ते वाचवा
पुणो : गणोशोत्सव काळात शहरात बहुतेक गणोश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप उभारले जातात. मात्र, काही मंडळे खड्डे टाळण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार करताना दिसत आहेत. मंडप उभारताना विविध पर्यायांचा वापर केल्यास गणोशोत्सवानंतर पुणोकरांना रस्त्यावरील वाहतूक सुसह्य वाटेल. मंडळांनी ‘खड्डे टाळा, रस्ते वाचवा’ हा नवा आदर्श घालून देत गणोशोत्सवाला ख:या अर्थाने विधायक स्वरूप निर्माण करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे.
शहर व उपनगरांमध्ये लहान-मोठी हजारो गणोश मंडळे आहेत. यातील बहुतेक मंडळे रस्त्यावर मंडप उभारताना रस्त्यांत खड्डे करतात. मंडपाच्या आकारानुसार खड्डय़ांची संख्या वाढत जाते. गणोशोत्सव झाल्यानंतर मात्र काही मंडळांकडून हे खड्डे बुजविले जात नाहीत, तर काही मंडळांकडून हे खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविले जातात. मात्र, कालांतराने हे खड्डे उखडतात. पावसामुळे छोटय़ा खड्डय़ांचे रुपांतर मग मोठय़ा खड्डय़ात होत जाते. पाणी साठल्याने त्या भागातील रस्ता आणखी खराब होत जातो. हे टाळण्यासाठी मंडप उभारताना काही पर्यायांचा विचार केला जावू शकतो. शहरातील काही मंडळे या पर्यायांचा विचार करू लागली असून, खड्डे टाळण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.
खजिना विहीर गणोश मंडळाने मागील दोन वर्षापासून हा प्रयोग सुरू केला आहे. मंडळाचा देखावा दर वर्षीच मोठा असतो. त्यामुळे पूर्वी मंडपासाठी जास्त खड्डे घ्यावे लागत होते. मंडळाचे सुरेश कासार म्हणाले, खड्डे टाळण्यासाठी दोन वर्षापासून केवळ मंडपाच्या चार मुख्य खांबांसाठीच खड्डे घेतले जात आहेत. इतर खांबांसाठी खड्डे न करता लोखंडी प्लेट्सचा वापर केला जातो. यावर्षीही याचाच उपयोग करण्यात आला आहे.
कुणाल मंडपचे कुणाल पोकळे म्हणाले, कमीत कमी खड्डे खोदून मंडप उभारण्याचा प्रयत्न असतो. मंडपासाठी लोखंडी रचना वापरल्यास एकही खड्डा लागत नाही. सिमेंट रस्त्यावर खड्डा घेणो शक्य नसल्याने याचा वापर करण्यात आला आहे. तसेच दर वर्षी नवीन खड्डे घेण्याऐवजी कायमस्वरूपी कृत्रिम खड्डे तयार करता येतात. (प्रतिनिधी)
गणोशोत्सव मंडळांना आवाहन
रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डे घेणो टाळण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची माहिती पाठवा. आपल्या अभिनव उपक्रमांमुळे इतर गणोशोत्सव मंडळांनाही प्रेरणा मिळेल. आनंददायी गणोशोत्सव अधिक सुरक्षित करण्यासाठी ते पाऊल ठरेल.
पत्ता : व्हीया वेन्टेज, 1/2 मजला, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो.
ऐं्र’ : ँी’’स्र4ल्ली’‘ें3.ूे
- संपादक