शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जगात चौथा, देशात पहिला! कोल्हापूरच्या विश्वजितने सर्वाधिक वेळा प्लेटलेट्स दान केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:21 IST

विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले.

- सचिन भोसले

कोल्हापूर : जगातील सर्वाधिक मोठे दान म्हटले तर रक्तदान म्हणता येईल. त्यातही दुर्मीळ प्लेटलेट्स म्हणजे रक्तातील महत्त्वपूर्ण घटक होय. अनेक रुग्णांचे प्राण या घटकामुळे वाचतात. त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा महत्त्वपूर्ण प्लेटलेट्सचे १७० वेळा कोल्हापूरच्या विश्वजित काशीद (Vishwajit kashid) या २८ वर्षीय युवकाने दान केले आहे. त्यामुळे तो जगभरातील चौथा एबी निगेटिव्ह रक्तदाता व भारतातील पहिलाच रक्तदाता ठरला आहे. (Vishwajit kashid became india's first most frequent platelets donor.)

विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले. त्यानंतर आजतागायत त्याने १७० वेळा प्लेटलेट्स दान केल्या आहेत. त्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल. त्याचा एबी निगेटिव्ह हा रक्तगट आहे. त्यात तो जगभरात प्लेटलेट्स दान करण्यात चौथ्या क्रमांकावर, तर भारतात पहिल्या क्रमांकाचा दाता आहे. त्याच्या कार्याची दखल घेत २०१८ साली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध डॉ. रघू यांच्या हस्ते त्याचा ‘यंग मेडिकल सायंटिस्ट’ म्हणून गौरव केला. असा पुरस्कार मिळवणारा तो भारतातील पहिला अभियंता ठरला आहे. यापूर्वी असा मान पटकाविणारे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर होते. यामध्ये सर्वाधिक लोकांनी सहभागी व्हावे, याकरिता ब्लड बँक टूरिझम ही मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे युवक या मोहिमेत सहभागी होत आहेत. त्याने आतापर्यंत अमेरिका, युरोप, जर्मनी, इंग्लड आदी ठिकाणी प्लेटलेट्सबद्दल जनजागृती केली आहे. त्याचा तेथे या कार्याबद्दल गौरव केला आहे. त्याला याकामी प्रकाश घुंगुरकर व जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य मोठे राहिले आहे.

प्लेटलेट्स महत्त्वाचा घटक

मानवी शरीरात दीड ते साडेचार लाख एवढ्या प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेटची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधिर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यासदेखील रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लेटलेट उपलब्ध नसतात. रक्तदात्याकडून मिळालेल्या एक युनिट रक्ताचे विघटन केल्यास त्यातील एक अष्टमांश भाग प्लेटलेट्सचा असतो. प्लेटलेट्स साठविण्याचा कालवधी फक्त पाच दिवसांचा असल्याने प्लेटलेट डोनर महत्त्वपूर्ण ठरतात.

ब्लड बँक टूरिझमची संकल्पना

प्लेटलेट्सची माहिती सर्वांना व्हावी, याकरिता ब्लड बँक सहलीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून ५० जणांची मोफत सहल काढली जाते. यात ब्लड बँकेत नेऊन ब्लड बँकेचे काम, प्लेटलेट्सची शास्त्रीय माहिती तसेच प्लेटलेट्स डोनेशनसाठी प्रबोधन केले जाते.

कोण होऊ शकतो दाता?

प्लेटलेट्स दान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट काऊंट चांगला असला पाहिजे. प्लेटलेट दाता होण्यासाठी किमान वजन ५५ किलो व रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ असावे लागते. हाताच्या नसा जाड असाव्या लागतात. महिन्यातून दोन वेळा प्लेटलेट्स दान करता येते.

प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा रक्तदान केले तर देशाला रक्ताची गरज भासणार नाही व रक्त वायाही जाणार नाही. त्यामुळे तीन महिन्यांची सायकल प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. ही पद्धत युरोपीय देशात सुरू आहे. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थितीतही त्यांना रक्त पुरते. एकदा रक्तदान केल्यानंतर प्लेटलेट्सही दाता दान करू शकतो.

- विश्वजित काशीद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBlood Bankरक्तपेढी