Auto Racing : तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारच्या गाड्यांच्या शर्यती पाहिल्या असतील. पण, सांगली जिल्ह्यात मंगळवारी(दि.24) आगळ्या-वेगळ्या ऑटो रिक्षा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. ही शर्यत होती रिव्हर्स रिक्षा ड्रायव्हिंग(उलट दिशेने ऑटो चालवणे)ची. संगमेश्वर यात्रेनिमित्त हरिपूर गावात ही शर्यत आयोजित करण्यात आली होती.
वृत्तसंस्था एएनआयने या शर्यतीचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे. एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, ऑटो-रिक्षा चालक उलट दिशेने ऑटो चालवताना दिसत आहे. शर्यत पाहण्यासाठी आणि सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी लोकांची तुफान गर्दी जमली होती. या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्हू मिळाले असून, यावर नेटीझन्स वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.
एका युजरने लिहिले, "ही छान शर्यत आहे! यांना अधिक बळ मिळो. फक्त पाहणाऱ्यांसाठी अधिक सुरक्षितता हवी." दुसऱ्या एकाने लिहिले, "ऑटो रिक्षांमध्ये रिव्हर्स गिअर असतात का? ते कधी वापरलेले पाहिले नाही." आणखी एकाने लिहिले, "या रेसिंग ट्रॅकच्या बाजूला उभे असलेले लोक किती मूर्ख आहेत, हे लोक त्या ऑटोच्या अगदी जवळ उभे आहेत."