शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ऑक्सिजनअभावी मृत्यूला अधिकारीच जबाबदार; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 05:38 IST

यापुढे जबाबदारीने ऑक्सिजन पुरवठा करावा

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही तसेच ऑक्सिजनअभावी रुग्णालयाने रुग्णास परत पाठविल्यास किंवा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि चार नोडल अधिकारी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल. इथून पुढे या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अन्यथा हे अधिकारी वैयक्तिक कारवाईस पात्र ठरतील, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. 

कोविडविषयक सुमोटो याचिकेवरील सुनावणी बुधवारी झाली. त्यावेळी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी शासनाला हे आदेश दिले. अन्न आणि औषधी विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी बुधवारी शपथपत्र दाखल करून विभागात तसेच संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो आहे आणि रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा नक्की केला जाईल, त्यामुळे रोज २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती केली. यावर खंडपीठाने तशी दुरुस्ती करण्यास मान्यता देत वरील प्रमाणे आदेश दिला. तसेच १ जानेवारी २०२१ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) ला विविध शासकीय संस्था (एनजीओ), केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून किती व्हेंटिलेटर मिळाले. त्यांचे कार्य काय आहे, ते का खराब होतात, याची माहिती सरकारी वकिलांना देण्याचे सूचित केले. गरिबातील गरीब रुग्णाला कोविड केंद्रात नेण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध होईल. यासाठी दोन हेल्पलाईन नंबर जारी केले जातील, अशी ग्वाही शासनातर्फे आजच्या सुनावणी दरम्यान देण्यात आली. 

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा काळाबाजार का होतो, अशी विचारणाही खंडपीठाने केली. याच विषयावर शुक्रवारी २१ मे रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे, तर शिर्डी संस्थान आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कोविडसंदर्भातील याचिकांवर २५ मे रोजी सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, औरंगाबाद महापालिकेतर्फे ॲड. संतोष चपळगावकर आदींनी काम पाहिले.

‘कार्यकर्त्यांना आवर घाला’आज देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत असताना इंधन दरवाढ व अन्य कारणांनी विविध पक्ष कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शने करीत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आवर घालावी, अशी ताकीदवजा सूचना खंडपीठाने केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनHigh Courtउच्च न्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल