ओसाड माळरानावर पिकवली आॅस्ट्रेलियन थायलेमनची (लिंबू)शेती
By Admin | Updated: August 19, 2016 13:29 IST2016-08-19T13:23:27+5:302016-08-19T13:29:17+5:30
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील परेश देशमुख या २५ वर्षीय युवकाने ओसाड माळरानावर सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत आॅस्ट्रेलियन थायलेमनची (लिंबू) विदेशी शेती यशस्वी केली.

ओसाड माळरानावर पिकवली आॅस्ट्रेलियन थायलेमनची (लिंबू)शेती
ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुर्हे (नाशिक), दि. १९ - अनेक बेरोजगार युवकांना रोजगार नसल्यामुळे भटकंती करावी लागते. शेती व्यवसायत देखील खूप समस्या निर्माण झाल्याने मोठ्या प्रसंगांना तोंड दयावे लागत असल्यामुळे युवक शेतीकडे कधीही तिळमात्र ढुंकूनही बघत नाही मात्र पारंपारिक शेतीव्यवसायाला प्रचंड मेहनतीची जोड देत काही जिगरबाज युवक उदासीन न होता नवीन प्रयोगांच्या शोधात ओसाड माळरानावर देखील यशस्वी शेती करून दाखिवतात.
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील परेश देशमुख या २५ वर्षीय युवकाने ओसाड माळरानावर सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत आॅस्ट्रेलियन थायलेमनची (लिंबू) विदेशी शेती यशस्वी केली आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्याचा नवीन प्रयोग पाहण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर येथून अनेक अतिथी येत असतात व त्यांचे कौतुक करून जातात.
शेतीमध्ये फुलवलेला आस्ट्रेलियन थायलेमन बाजारात दाखल झाला असून त्याला उत्पादन चांगले मिळत आहे.
ओसाड माळरानावर ड्रीप पद्धतीने लागवड केली आहे. विविध प्रकारची सेंद्रिय खतांचा मारा करून शेणखत, गांडूळखत शेतीला देऊन जीवदान मिळत आहे. विशेष म्हणजे स्वत: गोपालन करून त्यापासून सेंद्रिय खत घरीच तयार केले जाते. बेरोजगार युवकाने मोठ्या परिश्रमाने पिकवलेले आॅस्ट्रेलियन थायलेमन आता नाशिक सारख्या ठिकाणी विक्र ीसाठी जातात. इगतपुरीचे तत्कालीन कृषिअधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांच्या मदतीने हा प्रयोग उभा केला आहे. पारंपारिक शेती करता करता टोचे यांना विदेशी शेतीचा मार्ग सापडला आहे. निनावी येथे शेती करणारा हा यशस्वी युवक मूळचा भगूर येथील रहिवाशी असून त्याचे पोलीस दलात नोकरीला असलेले काका मुकुल देशमुख व आईवडील देखील त्याला शेतीमध्ये मदत करीत असतात.
अडीच एकरच्या ओसाड बाभळीच्या माळरानावर या युवकाने फुलवलेली आॅस्ट्रेलियन शेती बेरोजगार तरु णांपुढे अन शेतीकडे न बघणार्या शेतकर्यांसाठी नक्कीच आदर्श उदाहरण ठरली आहे. बाभळीच्या माळरानावर केलेल्या या शेतीतुन त्यांना उत्पादन देखील चांगले मिळत आहे.
शेती व्यवसायात अनेक दु:खाचा झुंजारपणाने सामना करून केवळ आत्मविश्वासाच्या बळावर या युवकाने माहिती तंत्रज्ञानाने उभी केलेली त्याची शेती युवकांना आशादायक ठरली आहे.
माझे शिक्षण पूर्ण झाले तरी नोकरी कुठेही मिळाली नाही मात्र मी कोणत्याही गोष्टीची परवा न करता जिद्दीने आॅस्ट्रेलियन शेती एक वर्षांपासून करतो आहे. लवकरच पारंपारिक सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन म्हणून तालुक्यातील शेतकर्यांसाठी आत्माच्या संयोगाने मार्गदर्शन शिबीर घेणार आहोत. येणार्या डिसेंबर मधील माङया शेतीतील फुलवलेला आॅस्ट्रेलियन थायलेमन दुबई, कतार, साउथ अरेबिया याठिकाणी निर्यात करणार आहोत. माझ्या यशात तत्कालीन कृषिअधिकारी बाळासाहेब मुसमाडे व काका मुकुल देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.
- परेश देशमुख, यशस्वी शेतकरी युवक