शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:16 IST

'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.'

औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.

'आमच्यासाठी औरंगाबादच असेल'''आज आमची संपूर्ण नाराजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. यांनी आतापर्यंत आपली सत्तेसाठी खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. कॅबिनेट मीटिंगमधून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर आले होते, त्यांना थोडीही लाज असेल तर आजच राजीनामा द्यावा. अशाप्रकारचे नाटक करुन लोकांना मूर्ख बनवू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे. खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ आहे. औरंगाबादचा एक इतिहास आहे, तुम्ही शहराचा इतिहास मिटवू शकत नाही. तुम्ही काहीही नाव ठेवा, पण आमच्यासाठी हे शहर औरंगाबादच असेल.''

'उद्धव ठाकरे तुम्ही तोंड लपवू शकत नाही'

''आज त्यांना कळालं आहे की, त्यांची सत्ता जाणार आहे. तिन पायांचे सरकार स्थापन केले आणि जाता-जाता असा निर्णय देऊन गेले. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे की, काही दिवसांपूर्वीच तुम्ही या शहरात आला होता. तुम्ही म्हणाला होता की, आम्ही औरंगाबादचा विकास आधी करू, पाणी देऊ. पण, आता अचानक काय जादू झाली अन् नामकरणाचा निर्णय घेतला. तुम्ही आता तोंड लपवू शकत नाही, जनतेसमोर यावंच लागेल. तुमच्या नीच राजकारणामुळे शहराचे वातावरण बिघडवू शकत नाही, हे शहर आमचे आहे. तुमच्या नीच राजकारणाला आम्ही योग्य उत्तर देऊ.''

संबंधित बातमी -'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक

'महाराजांवर तुमचे प्रेम नाही'''तुमचे संभाजी महाराजांवर प्रेम नाही, त्यांचे नाव वापरुन तुम्हाला राजकारण करायचे आहे. आज हा निर्णय तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी घेतला आहे. आता हा निर्णय केंद्रात गेला आहे, केंद्र विचार करेल की, लगेच यावर निर्णय घेतला तर क्रेडीट शिवसेनेला जाणार. यांना महाराजांवर प्रेम नाही, यांना फक्त राजकारण करायचे आहे. आमच्या पक्षांनी कधीच महापुरुषांचा वापर राजकारणासाठी केला नाही, पण यांनी आजपर्यंत हेच केलं.''

'नेत्यांच्या फोटोला चपलांचा हार घाला'''औरंगाबादच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दलाल नेत्यांना माझं चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शहरात फिरुन दाखवा. तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही फिरू शकत नाही. तुम्ही लोकांचा विश्वासघात केला आहे. काही महिन्यानंतर निवडणुका होतील, तेव्हा यांना उत्तर मिळेलच. तोपर्यंत मी शहरातील लोकांना आवाहन करतो की, या नेत्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, याच लायकीचे आहेत हे नेते. चंद्रकांत खैरैंनी आता प्रोफेशनल डान्सर व्हावं, आता त्यांचे राजकारण राहिले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावरुन निवडून यायचे, आता हा मुद्दा पार पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय काही काम उरले नाही.''

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन