शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:17 IST

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.

'या नेत्यांवर थुंका...'या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधताना जलील म्हणाले की, ''आजचा निर्णय अतिशय घाणेरड्या राजकारणासाठी घेण्यात आला आहे. आता शहरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलांचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका. यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. सत्तेचा इतकाच मोह होता, तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. आम्ही चपला मारू अशा नेत्यांना,'' अशी घणाघाती टीका जलील यांनी केली. 

'आता येऊन दाखवा औरंगाबादमध्ये'यावेळी जलील यांनी देशातील प्रमुख नेत्यांवरही टीका केली. ''मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होतात का? आता येऊन दाखवा औरंगाबादला, मग दाखवू तुम्हाला. उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण जायची वेळ आली तर नीट जायचं ना, असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज नव्हती.''

संबंधित बातमी-'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

'आम्ही लढत राहू'''राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी आजच राजीनामे द्यावे. हा मुद्दा आता केंद्र सरकारकडे गेला आहे, केंद्र यावर निर्णय घेईल. तोपर्यंत आम्ही यासाठी लढत राहू, वेळ आल्यावर रस्त्यावरही उतरल्याशिवाय राहणार नाही. मी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या जनतेला आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी. अजून सर्व मार्ग बंद झाले नाहीत, दुसऱ्या मार्गांचा वापर करू,'' असेही जलील म्हणाले. 

'चंद्रकांत खैरेंनी डान्स करत बसावं'''औरंगाबादच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दलाल नेत्यांना माझे चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर आज शहरात फिरुन दाखवा. तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही फिरू शकत नाही. तुम्ही लोकांचा विश्वासघात केला आहे. काही महिन्यानंतर निवडणुका होतील, तेव्हा यांना उत्तर मिळेलच. तोपर्यंत मी शहरातील लोकांना आवाहन करतो की, या नेत्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, याच लायकीचे आहेत हे नेते. चंद्रकांत खैरैंनी आता प्रोफेशनल डान्सर व्हावं, आता त्यांचे राजकारण राहिले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावरुन निवडून यायचे, आता हा मुद्दा पार पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय काही काम उरले नाही,'' अशी टीकाही जलील यांनी केली.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे