औरंगाबादमध्ये माारुती कार पळवणा-या पाच जणांना तासाभरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 08:41 IST2017-08-03T08:33:18+5:302017-08-03T08:41:28+5:30
दौलताबाद घाटात दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची मारुती कार पळविणाऱ्या पाच दरोडेखोरांना जिंसी पोलिसांनी तासाभराच्या आत अटक केली.

औरंगाबादमध्ये माारुती कार पळवणा-या पाच जणांना तासाभरात अटक
औरंगाबाद, दि. 3 - दौलताबाद घाटात दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची मारुती कार पळविणाऱ्या पाच दरोडेखोरांना जिंसी पोलिसांनी तासाभराच्या आत अटक केली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेले जिन्सीचे चार्लीचे पोलीस कर्मचारी अनिल कोमटवार व लखन खंदारे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शोध सुरु केला.
घटनेनंतर अवघ्या तासाभरात २:३० वाजण्याच्या सुमारास गुरुनानक पेट्रोलपंप,सेवन हिल, जालना रोड येथे मुद्देमालासहित आरोपींना पकडले. आरोपींकडून लुटलेली कार जप्त करून दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.