अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

By Admin | Updated: November 16, 2014 00:18 IST2014-11-16T00:18:05+5:302014-11-16T00:18:05+5:30

पुण्यात गेल्या 1क् वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे.

Aub .. a fat man behind three! | अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

पुणो : पुण्यात गेल्या 1क् वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे पुणोकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणोकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या 1क् वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. याबाबत ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. शशांक शाह ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. आम्ही केलेल्या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणो वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणो आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत.
ज्येष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ. अविनाश इनामदार म्हणाले, चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो. चरबी ही पहिल्यांदा रक्तवाहिन्यांच्या बाहेर असते; पण ती सातत्याने वाढत राहिली, की रक्तवाहिन्यांमध्येही निर्माण होते आणि रक्ताच्या प्रवाहास अटकाव करते. यामुळे हृदयविकार होतात. त्यातही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप वाढतो. लठ्ठपणामुळे हालचाल कमी झाल्याने आणि वजन वाढल्याने हृदयावर खूप ताण येतो. या दोन्ही गोष्टी हृदयविकारास कारणीभूत ठरतात. याचबरोबर अनुवंशिकता, थायरॉइड ग्रंथींचे असंतुलन यामुळेही लठ्ठपणा येतो. लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. आपली मुले चांगली दिसावीत, यासाठी त्यांना चरबी-स्निग्धयुक्त पदार्थ खायला दिले जातात. याचबरोबर सतत दारू पिण्यामुळे, बिअर पिण्यामुळे लठ्ठपणा वाढतो. हे रोखण्यासाठी नियमित व्यायाम करणो, अवेळी जेवण टाळणो, प्रथिनेयुक्तआहार घेणो, जंकफूड-फास्टफूड टाळायला हवे. (प्रतिनिधी)
 
4सारखी चहा-कॉफी घेणो हे लठ्ठपणाचे मोठे कारण असल्याने ते टाळा.
4जंकफूड, फास्टफूड खाणो टाळा.
4प्रथिनांनी युक्त असलेला आहार वेळोवेळी घ्या.
4नियमित थायरॉइड ग्रंथींच्या स्तरांची तपासणी करा.
4सकाळी भरपूर नाष्टा, दुपारी मध्यम जेवण आणि रात्री लवकर हलके जेवण घ्या.
4नियमित व्यायाम करा, ते शक्य नसल्यास भरपूर हालचालींचे काम करा.
4हे सर्व करूनही लठ्ठणा कमी होत नसल्यास, बॅरिअॅट्रिक सर्जरी करा.
 
लठ्ठपणामुळे लहान मुलांना जडतायेत आजार
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा निर्माण होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. लठ्ठ असणा:या 
1क् टक्के मुलांना मधुमेह, हृदयविकार आदी आजार जडले आहेत. याच्या मुळाशी लठ्ठपणाच आहे. दहा वर्षापूर्वी लहान मुलांना सोडा मोठय़ांनाही लठ्ठपणा आजार जडण्याचे प्रमाण खूपच कमी होते. 
- डॉ. शशांक शाह,
अध्यक्ष, ओबेसिटी सर्जरी सोसायटी 
ऑफ इंडिया.
 
वाढलेले वजन आणते 
हृदयावर ताण
लठ्ठपणामुळे वजन वेगाने वाढते. हे वाढलेले वजन आणि हालचालीचा अभाव यामुळे हृदयावर मोठा ताण पडतो. यातून रक्तदाब निर्माण होतो आणि पुढे हृदयविकाराचे झटके येतात. आयटी क्षेत्रतील तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असून, त्यातील बहुतांशी लोकांना हृदयविकार जडलेले पाहायला मिळतात.
- डॉ. अविनाश इनामदार,
ज्येष्ठ हृदयशल्यचिकित्सक.

 

Web Title: Aub .. a fat man behind three!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.