मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:16 IST2025-09-25T15:12:59+5:302025-09-25T15:16:07+5:30
CM Devendra Fadnavis Navi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नवी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी दोन घटना घडल्या आहेत. भाषणावेळी घोषणाबाजी आणि फलक दाखविले गेले.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नवी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी दोन घटना घडल्या आहेत. फडणवीस यांच्या भाषणावेळी एशियन पेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उभे राहून मोठ्या आवाजात आपल्या मागण्या सांगण्यास सुरुवात केली. यानंतर लगेचच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा म्हणून फलक दाखवले. यानंतर कार्यक्रम संपवून फडणवीस वाहनात बसल्यानंतर त्यांची भेट घेऊन फडणवीसांच्या ताफ्यातील दुसऱ्या वाहनात बसण्याचा प्रयत्न करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील खाली कोसळल्याची घटना घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी गोंधळ घालण्यात आला. आधी एशियन पेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उभे राहून मागण्या केल्या. यानंतर नवी मुंबईतील काही नागरिकांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा म्हणून फलक दाखवले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर फडणवीस यांनी आपल्या सर्व मागण्या आणि घरांच्या किंमती बाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
तर कार्यक्रम स्थळावरून पुढच्या दौऱ्याला जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारमध्ये बसताना नरेंद्र पाटील खाली कोसळले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ताफ्यामदील दुसऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र, चालकाने गाडी पुढे नेल्याने तोल जात नरेंद्र पाटील खाली पडले. या घटनेत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.