शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

अस्पृश्यतेचा डाग पुसण्याचा प्रयत्न!

By admin | Updated: March 13, 2015 05:50 IST

अस्पृश्यता आणि जातीभेदामुळे जनमानसात काळवंडलेली प्रतिमा पुसून काढण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे़ शुक्रवारपासून नागपुरात होणा-या अखिल भारतीय प्रतिनिधी

नागपूर : अस्पृश्यता आणि जातीभेदामुळे जनमानसात काळवंडलेली प्रतिमा पुसून काढण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे़ शुक्रवारपासून नागपुरात होणा-या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत प्रत्येक गावातील मंदिरे, जलाशय व स्मशानभूमीत सर्वांनाच प्रवेश मिळावा, अशा आशयाचा ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली़ वैद्य म्हणाले, प्रत्येक गावात जातीगत भेदभाव दिसून येतो. हे दूर करण्यासाठी संघाने पुढाकार घेतला (असून, त्यावर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. काही ठिकाणी संघाने यादृष्टीने प्रयोगदेखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरापासूनच मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे. इंग्रजीचा प्रसार वाढत असताना मातृभाषेचे महत्त्व किती आहे, यावर मंथन होणार आहे. यासोबतच २१ जून हा संयुक्त राष्ट्रसभेतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. याच्या प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने तिसरा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे वैद्य म्हणाले़ प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल, अशी माहिती वैद्य यांनी दिली. (प्रतिनिधी)> काश्मीर मुद्यावर मौन‘पीडीपी’सोबत हातमिळवणी करुन सत्तास्थापनेनंतर भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. ३७० कलम रद्द करणे हा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर आहे. परंतु आता भाजपाला यावर ठोस भूमिका घेणे अवघड जाणार आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे. या प्रतिनिधी सभेत मात्र यावर चिंतन होणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.