शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निमलष्करी दलाप्रमाणे पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:16 IST

निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत़.

ठळक मुद्देनिमलष्करी दलाच्या धर्तीवर  पोलिसांसाठी प्रशिक्षण व संशोधन प्रकल्पखंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रात ३ कोर्स सुरु प्रशिक्षण हा पोलिसांवर असलेला तणाव कमी करण्याचा एक भागपोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर खासगी व्यक्ती संशोधन करणार असेल तर त्यांचे स्वागत

पुणे : पोलीस दलात भरती झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सामाजिक, आर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टी प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्स सुरु करण्यात येत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़. पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील सभागृह व स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस या प्रशिक्षण कोर्सचे जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले़. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. जयस्वाल यांनी सांगितले की, मुंबई तंदुरुस्त नसलेल्या पोलिसांसाठी आम्ही एक महिन्याचा कोर्स आयोजित केला होता़. त्याचा चांगला परिणाम दिसून आला़ पोलिसांपुढील आव्हाने वाढली आहेत़. निमलष्करी दलाच्या धर्तीवर  पोलिसांसाठी प्रशिक्षण व संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे़. पोलीस निरीक्षक ते विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्रात ३ कोर्स सुरु करण्यात आले आहेत़ .या प्रशिक्षणासाठी निधीची कमतरता पडणार नाही. तसेच त्यात खंडही पडणार नाही़. सोशल मीडियाचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे़, याला कसे हाताळावे, पोलिसांच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे़ घडणाऱ्या घटनांना सामोरे जाताना पोलिसांनी कोण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, याचा बेंचमार्क निश्चित करणे, पोलिसांची कार्यक्षमता, त्यांचे आकलन करण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणणे अशी उद्दिष्टे ठेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे़. प्रशिक्षण हा पोलिसांवर असलेला तणाव कमी करण्याचा एक भाग आहे़. 

संशोधनासाठी खासगी व्यक्तींचे स्वागतपोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करुन आणखी चांगली सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन होण्याची आवश्यकता आहे़. त्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर खासगी व्यक्ती संशोधन करणार असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल़. संशोधनासाठी अनेक विषय आहेत़ त्यासाठी आवश्यक तो डाटा पुरविण्यात येईल़. कोणत्या विषयावर संशोधन करायला हवे हे निश्चित करण्यासाठी समिती असणार आहे़. यावेळी सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस