शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
4
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
5
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
6
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
7
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
8
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
9
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
10
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
11
“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
12
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
13
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
14
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
15
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
16
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर
17
३० वर्षांनी शुक्र-शनीचा समसप्तम योग; ११ ऑक्टोबरला ५ राशींना लाभ, इतरांनी घ्या 'ही' काळजी!
18
तुम्हीही गृह कर्ज काढलंय? CA च्या ५ स्मार्ट हॅक्सने ५० लाखांच्या कर्जात वाचवा तब्बल ३६ लाख रुपये
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
20
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भयंकर त्सुनामीचा इशारा

चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:08 IST

अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : काेल्हापुरमधील चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना माेबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फाेटाे पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी एका महिलेने केली. पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पाेलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

 ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले. पुढे त्यांच्याकडे तिने कधी एक लाख, कधी दाेन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाखांची मागणी केली.

काही दिवसांनंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली. 

पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी ८ ऑक्टाेबर राेजी ठाण्यातील चितळसर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandgad MLA Targeted in Honey Trap; Case Filed in Thane

Web Summary : Chandgad MLA Shivaji Patil faced a honey trap attempt, with an unidentified woman demanding ₹10 lakh after sending obscene messages and photos. Patil filed a complaint in Thane, leading to a cybercrime investigation.
टॅग्स :MLAआमदारhoneytrapहनीट्रॅप