मुंबईत चालत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न

By Admin | Updated: August 8, 2015 12:38 IST2015-08-08T10:55:05+5:302015-08-08T12:38:29+5:30

मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

The attempt of raping young woman in a moving locality in Mumbai | मुंबईत चालत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न

मुंबईत चालत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ -  मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड व चर्नी रोड स्थानंकादरम्यान गुरूवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. महत्वाची गोष्ट म्हणजे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारा त्या नराधम आरोपीचा चेहरा स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी मालाड स्टेशनला चर्चगेटच्या दिशेने जाणा-या लोकलमध्ये चढली. गाडीत त्यावेळीस फारशी वर्दळ नव्हती याचाच फायदा घेत आरोपीने त्याचा डाव साधत तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार डब्याच्या दुस-या टोकाला बसलेल्या काही महिलांच्या लक्षात आल्याने आरोपीने पुढील स्टेशन येण्याआधीच धावत्या ट्रेनमधून खाली उडी टाकली. ट्रेनमधील इतर प्रवासी महिलांनी पीडित मुलीला स्टेशन मास्तरकडे नेलं  व त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिची चौकशी केली. दरम्यान तरुणीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, परंतु रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.  दरम्यान रात्रीची वेळ असूनही गाडीत सुरक्षारक्षक नव्हता. पण काही तांत्रिक कारणांमुळे सुरक्षारक्षक वेळेत त्या लोकलमध्ये पोचू शकला नाही असे स्पष्टीकरण रेल्वे अधिका-यांनी दिले आहे. या धक्कादायक घटनेनंतर मुंबईत महिला खरच सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. 

Web Title: The attempt of raping young woman in a moving locality in Mumbai