जैन मंदिरात दरोड्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: July 5, 2015 01:53 IST2015-07-05T01:53:28+5:302015-07-05T01:53:28+5:30

येथील प्रसिद्ध श्री पार्श्वनाथ स्वामी जैन मंदिरात ८ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या अद्ययावत सुरक्षा यंत्रणेमुळे हा प्रयत्न फसला

The attempt to dock the Jain temple is unsuccessful | जैन मंदिरात दरोड्याचा प्रयत्न फसला

जैन मंदिरात दरोड्याचा प्रयत्न फसला

भद्रावती (जि़चंद्रपूर) : येथील प्रसिद्ध श्री पार्श्वनाथ स्वामी जैन मंदिरात ८ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या अद्ययावत सुरक्षा यंत्रणेमुळे हा प्रयत्न फसला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत.
श्वान पथक, बोटांचे ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. दरोडेखोरांनी सुरुवातीला त्यांनी मंदिरात तैनात सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. संदीप धोटेकर व विलास धोटेकर या सुरक्षारक्षकांचे हात-तोंड बांधून दोघांनाही खोलीत डांबून ठेवले, तर तिसरा सुरक्षारक्षक रामदिन यादव याला सोबत घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्या ठिकाणी दोन दानपेट्यांचे कुलूप तोडण्यात ते यशस्वी झाले, परंतु मधले कुलूप त्यांना तोडता आले नाही. दरम्यान, मुख्य मूर्तीच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार तोडताना
सायरन वाजल्याने दरोडेखोरांची तारांबळ उडाल्याने त्यांनी पळ काढला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The attempt to dock the Jain temple is unsuccessful