शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Attack on Mohit Kamboj By Shivsena: मोहित कंबोज मुद्दाम तिथे आले, गाडीतून उरले अन्...आम्ही पाहिले; शिवसैनिकांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 22:37 IST

Attack on Mohit Kamboj By Shivsena: कंबोज म्हणतात, लग्नाला गेलेलो; शिवसैनिक म्हणतात तिथे त्यांच्यासाठी एवढा हायफाय हॉलच नाही. 

मातोश्री बाहेर आधीच खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसा पठणावरून वातावरण तापलेले असताना उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजपा नेते मोहित कंबोज तिथे पोहोचले होते. यामुळे शिवसैनिकांनी कंबोज यांच्या कारवर हल्ला केला. यामुळे तेथील वातावरण आणखी चिघळले होते.

Attack on Mohit Kamboj By Shivsena : मातोश्रीबाहेर जोरदार राडा! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; पोलिसांचा हस्तक्षेप

मोहित कंबोज कलानगरमधून घरी जात होते. हा रस्ता तिथे जात नाही. कलानगरात कंबोजसारख्यांच्या राहणीमानाप्रमाणे हायफाय हॉल नाहीत. खोटे सांगत आहेत. मोहित कंबोज मुद्दामहून तिथे आले होते. गाडीतून उतरले आणि फोटो काढत होते. शिवसैनिकांनी अडविले आणि पकडण्यासाठी गेले असता ते गाडीत बसून पळून गेले, त्यांच्या गाडीत हॉ़कीस्टीक हत्यारे होती, असे तेथील शिवसैनिकांनी सांगितले. एबीपीला घटनास्थळावरील शिवसैनिकांनी ही माहिती दिली आहे. कंबोज यांनी एसपींनाही ढकलल्याचा आरोप त्यांनी केला. 

कंबोज यांनी आपण लग्नाला गेलो होतो असे सांगितले. या लग्नाला एक मंत्रीदेखील आले होते. मुंबईत असा हल्ला होत असेल तर त्याहून शरमेची बाब नाही. शेकडो शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. कलानगरयेथील पुलाजवळ हा हल्ला झाला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. 

तर शिवसेना आमदार सुर्वे यांनी मोहित कंबोज मातोश्रीबाहेर वातावरण तापलेले असताना तिथे कशासाठी आले होते? तेथील वातावरण बिघडलेले आहे हे सर्वांना माहिती आहे. यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, असा आरोप केला आहे. तर भाजपाचे आमदार भातखळकर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात कंबोज यांच्या महागड्या एसयुव्हीचा आरसा, दरवाजावर लाथा आणि अन्य भागाची मोडतोड करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईBJPभाजपाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा