कर्जत तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: October 21, 2016 10:00 IST2016-10-21T10:00:44+5:302016-10-21T10:00:44+5:30

अहमदनगरमधील कोपर्डी येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे.

Atrocity against minor girl again in Karjat taluka | कर्जत तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कर्जत तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २१ -  अहमदनगरमधील कोपर्डी येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. 
कर्जत शहरातील भांडेवाडी येथील आठ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केला आहे. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण असून आज सकाळपासून कर्जत शहर बंद असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Web Title: Atrocity against minor girl again in Karjat taluka