अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:39 IST2018-05-05T00:39:50+5:302018-05-05T00:39:50+5:30

१५ वर्षीय मुलीवर मागील काही महिन्यांपासून जबरी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. ४ मे रोजी पोट दुखत असल्याने तिला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तिने मृत अर्भकास जन्म दिल्याने हे बिंग फुटले. यामुळे औंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

 Atrocities on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : १५ वर्षीय मुलीवर मागील काही महिन्यांपासून जबरी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. ४ मे रोजी पोट दुखत असल्याने तिला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तिने मृत अर्भकास जन्म दिल्याने हे बिंग फुटले. यामुळे औंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
औंढा तालुक्यातील उंडेगाव येथील १५ वर्षीय मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून तिच्याच घरी प्रेमसंबंधातून आरोपी रवी रोहीदास भारशंकर (रा.उंडेगाव) अत्याचार करीत होता. पोटात दुखत असल्याने फिर्यादी मुलीस रूग्णालयात आणले असता तिने पुरूष जातीच्या मृत अर्भकास जन्म दिला. पीडितेच्या फिर्यादीवरून औंढा पोलिसांत भादंविच्या ३७६ व फॉस्कोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके पाठविण्यात आले असल्याची माहिती पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

Web Title:  Atrocities on a minor girl