अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:37 IST2017-11-12T22:32:45+5:302017-11-12T22:37:24+5:30

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश जाधव याला ठाणे न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सखोल तपासासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.

Atrocities against minor girls; Police detained the accused | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी    

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी    

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून केला होता लैंगिक अत्याचार त्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती कोठडीची मागणी

ऑनलाइन लोकमत
ठाणे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश जाधव याला ठाणे न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सखोल तपासासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.
जून ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत त्याने लेनीननगर (ठाणे) या तिच्या राहत्या घरी तसेच शिर्डी येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्याच्या घरात भांडण झाल्यानंतर तिने त्याला तिच्या घरात आo्रय दिला होता. यातूनच झालेल्या ओळखीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदरही राहिली. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची डीएनए, वैद्यकीय तपासणी तसेच त्याने ज्याज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले, त्या ठिकाणचे पंचनामे आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून ती १७ नोव्हेंबरपर्यंत दिल्याचे पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Atrocities against minor girls; Police detained the accused