शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला..." CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:28 IST

Assembly Winter Session: आज अधिवेशनाचा अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Assembly Winter Session: आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वेगळ्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ''हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा. अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं,'' असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तर नागपूरमध्ये अधिवेशन झालं नसतं...मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ''आमच्या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं विरोधकांनी कौतुक करायला हवं होतं. आज जापान-चीनमध्ये कोरोना आहे. सरकार बदललं नसतं, तर इथे अधिवेशन झालंच नसतं. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत होतं. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचे काम केले. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळलं आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

50 जण कसे चुकतील?''आमचे सरकार आल्यानंतर दहीहंडी जल्लोषात झाली, गणेशोत्सव जोशात साजरा केला. लोकं बाहेर पडले त्याचा लोकांना आनंद झाला.  अजितदादा तुम्ही काल म्हणालात की मी चुकलो. जो माणूस चूक सुधारतो तो आत्मक्लेश करतो. मात्र काही लोक चुकले तरी आम्हीच बरोबर म्हणतात. एक माणूस चुकतो, दोन चुकतात, पाच चुकतात, दहा चुकू शकतात, पण 50 जण कसे चुकतील. तरीही एक माणूस म्हणतो पन्नास लोक चुकीचे आणि मीच बरोबर,'' असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार