शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड भेट; चर्चांना आले उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 06:45 IST

राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी काेर्टाने ३० ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्यात दुपारी ही बंदद्वार बैठक झाली. या बैठकीदरम्यान आमदार अपात्रतेबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवरात्रीच्या सुट्टीच्या काळात वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले हाेते. त्यामुळे आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक नार्वेकर यांना तयार करावे लागणार आहे. हे वेळापत्रक कोर्टात सादर झाल्यानंतर आमदार आपत्रतेबाबतचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे गुपित कायम असले तरी याबाबत विविध तर्क लढविले जात आहेत.

बैठकीमागील कारणे...विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पवित्रा हा आधी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा आहे. त्यानंतरच ते अपात्रतेबाबत निर्णय घेणार असल्याचे दिसते. दोन्ही गटांकडून यासाठी पक्षाच्या घटनाही मागून घेण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांच्या प्रमुखांनाही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे ही सुनावणी अनिश्चित काळासाठी चालणार असे चित्र असताना कोर्टाच्या आदेशामुळे ही सुनावणी लवकर संपून अपात्रतेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत त्यादृष्टीनेच चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष