शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेपूर्वी केंद्राने विदर्भासाठी ठोस निर्णय घ्यावा

By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST

तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता.

जनमंचची मागणी : लढा विदर्भाचानागपूर : तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता. मात्र सत्ता आल्यानंतर भाजप नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. नेत्यांचा डाव जनमंचने ओळखला असून, विदर्भाच्या बाबतीत केंद्र सरकारने विधानसभेपूर्वी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जनमंचद्वारे करण्यात आली आहे. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी जनमंचतर्फे विदर्भभर जनजागृती अभियान राबविणार असल्याचा इशारा जनमंचचे मार्गदर्शक चंद्रकांत वानखेडे यांनी पत्रपरिषदेत दिला. विदर्भाची मागणी १०० वर्षापूर्वीची आहे. जनमंचद्वारे घेण्यात आलेल्या सार्वमतात विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रचंड बहुमताने कौल मिळाला. निवडणुकीपूर्वी विदर्भातील सर्व उमेदवारांकडून लेखी हमीपत्रही घेतले होते. मात्र नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ राज्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची गरज असल्याचे म्हटले होते. यापूर्वी केंद्रात भाजपाची सत्ता असताना, मागणी नसतानाही तीन राज्याची निर्मिती केली होती. तेव्हा बहुमताची गरज नव्हती का, असा सवाल जनमंचने केला आहे. सत्ताधारी नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे विधानसभेपूर्वी केंद्राकडून ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा विदर्भाची मागणी पुन्हा रखडेल. जनमंचने सरकारवर दबाव बनविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आखला आहे. जनतेमध्ये जाऊन लोकांना संघटित करणे, आवश्यकता भासल्यास त्यांच्या संघटित शक्तीचे आंदोलनाच्या माध्यमातून प्रगटीकरण करणे, असा कार्यक्रम जनमंच राबविणार आहे. आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरातून व्यापक पाठिंबा मिळावा या हेतूने जनमंचने लेखक, कलावंत, वकील, प्राध्यापक या वर्गालासुद्धा लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यकर्ता बैठका, पथनाट्य, लघुचित्रपट, माहिती पुस्तिकेचे वितरण जनमंच करणार आहे. पत्रपरिषदेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे, रामभाऊ आखरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)