शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

आमचा फायदा होतोय, महाराष्ट्र भाजप त्यांचं समर्थन करो किंवा नाही माझं घेणंदेणं नाही : आसामचे मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:17 IST

शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“गुवाहाटीमध्ये २०० हॉटेल्स आहेत आणि सर्व हॉटेल्समध्ये अतिथी आहेत. आसाममध्ये पूर आहे हे सांगून मी काय त्यांना हॉटेलमधून पाठवून देऊ का? आसामचे लोक त्यांचे पैसे भरत नाहीत, किंबहुना ते त्यांच्याकडून पैसे घेत आहेत,” असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. “आमचा यात फायदा होत आहे. महाराष्ट्रात भाजप (शिवसेनेचे बंडखोर आमदार) त्यांचं समर्थन करो किंवा नाही, मला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. आसाममध्ये जर कोणी पाहुणे आले, तर त्यांची सुरक्षा आणि त्यांना सोयी मिळाल्या पाहिजेत इतकंच मला म्हणायचं,” असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :AssamआसामShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे