मारहाण करणारा 'तो' भाजपचा नगरसेवक निलंबित

By Admin | Updated: April 10, 2016 09:31 IST2016-04-10T09:05:12+5:302016-04-10T09:31:13+5:30

मारहाणप्रकरणी आता भाजपचा तो स्वीकृत नगरसेवक शिव शर्माला पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

The assailant 'he' suspended the BJP corporator | मारहाण करणारा 'तो' भाजपचा नगरसेवक निलंबित

मारहाण करणारा 'तो' भाजपचा नगरसेवक निलंबित

ऑनलाइन लोकमत

गोंदिया,  दि. 10- गोंदियात काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.  भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा यांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या मारहाणप्रकरणी आता भाजपचा तो स्वीकृत नगरसेवक शिव शर्माला पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
गोंदियामध्ये हॉटेल द ग्रँड सीतामध्ये गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया नगर पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल  शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा आणि त्यांचे साथीदार राहुल श्रीवास्तव तिथे आले आणि त्यांनी गोपाल अग्रवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
बचावासाठी त्यांचा मुलगा विशालमध्ये गेला होता. त्यावेळी विशाललाही जबर मारहाण झाली होती. विशेष म्हणजे मारहाणीचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या मारहाणीनंतर शिव शर्मा फरार  आहे.

Web Title: The assailant 'he' suspended the BJP corporator