शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

१२ आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदेंचा दावा; पण यादीतील २ जण आधीच 'उबाठा'त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:57 AM

आपलं या माणसासोबत भविष्य नाही. ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असं म्हणत सरोदेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. 

चंद्रपूर - Asim Sarode on Shivsena ( Marathi News ) निर्भय बनो या माध्यमातून अँड असीम सरोदे यांच्यासह इतर मंडळींनी चंद्रपूर इथं सभा घेतली. त्या सभेत सरोदेंनी शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत येणार असल्याचा दावा केला. या सभेत   सरोदेंनी थेट या १२ जणांच्या नावाची यादीच वाचून दाखवली. परंतु यातील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसून येते. त्यातील एका आमदाराचे नाव सरोदेंनी भलतेच घेतले. 

असीम सरोदे यांनी चंद्रपूरच्या सभेत म्हटलं की, शिंदेंकडे गेलेले १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात पालघरचे श्रीनिवास वनगा, चोपड्याच्या लता सोनवणे, अलिबागचे महेंद्र दळवी, मागाठणेचे प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिमणराव पाटील, बाळापूरचे नितीनकुमार तळे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, कन्नडचे उदयसिंह राजपूत, कोरेगावचे महेश शिंदे, राधानगरीचे प्रकाश आबिटकर ही नावे सांगितली. हे १२ जण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शरण येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलंय आपलं या माणसासोबत भविष्य नाही. ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. 

परंतु असीम सरोदेंनी भाषणात ११ आमदारांची नावे घेत १२ जण पुन्हा ठाकरेंकडे परतणार असा दावा केला. या वाचून दाखवलेल्या आमदारांच्या यादीतील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे निदर्शनास येते. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंकडेच आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, मला ५० कोटींहून अधिक ऑफर होती. माझ्या घरी गाडीतून पैसेही आले होते, माझ्याकडे त्याचे सीसीटीव्ही आहेत. पैशाने विकला जाणारा मी गद्दार नाही. माझ्या मुलांना मी काय तोंड दाखवले असते अशी टीका शिंदे गटावर केली होती. 

तर दुसरे बाळापूरचे आमदार नितीनकुमार तळे असं सरोदेंनी नाव वाचलं, ते नितीनकुमार तळे हे नितीन देशमुख नावाने प्रसिद्ध आहेत. जे शिवसेना फुटीवेळी शिंदे गटासोबत सूरत गुवाहाटीला गेले होते. मात्र त्यांना फसवून नेण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता. नितीन देशमुख हे फुटीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मात्र सरोदेंनी या आमदाराचे नावही त्याच यादीत जोडले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAsim Sarodeअसिम सराेदेShiv Senaशिवसेना