शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अश्विनी बिंद्रे-गोरे खून प्रकरण : मृतदेहासाठी वसई खाडीत शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:01 AM

निर्घृण हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदे्र-गोरे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी तपास पथकाने सोमवारी वसई खाडीत नऊ पाणबुड्यांनी साडेतीन तास शोधमोहीम राबविली.

मीरा रोड - निर्घृण हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदे्र-गोरे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी तपास पथकाने सोमवारी वसई खाडीत नऊ पाणबुड्यांनी साडेतीन तास शोधमोहीम राबविली. परंतु गाळ व गढूळ पाण्यामुळे त्यांना काही सापडले नाही. त्यामुळे मंगळवारीही शोधमोहीम सुरुच राहणार आहे.अश्विनी बिंद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याने भार्इंदरच्या गोडदेव येथील मुकुंद प्लाझामधील राहत्या घरी अश्विनी यांची हत्या केली. तसेच लाकूड कापण्याच्या कटर मशीनने मृतदेहाचे तुकडे करुन मित्र महेश पळणीकरसह वरसावे पुलावरुन वसई खाडीत टाकल्याचे तपासात उघड झाले आहे.त्याअनुषंगाने वरसावे भागात वसई खाडीत आरोपी पळणीकर याने ज्या जागा दाखवल्या तेथे शोधमोहीम घेण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, सहाय्यक आयुक्त नीलेश राऊत, संगीता अल्फान्सो, अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्यासह नौदलाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.यासाठी तीन स्पीड बोटी तैनात होत्या. या मोहीमेत पाण्याखालच्या कॅमेरांचा वापर करण्यात आला. खोल पाण्यात तसेच तळाशी शोध घेण्यात आला. परंतु आतील पाणी खुपच गढूळ होते. तसेच खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौदलाच्या पाणबुड्यांच्या हाती काही लागले नाही.दरम्यान, अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी सोमवारीही पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्यावर ते सुरवातीपासूनच आरोपी कुरुंदकर याला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच खाडीत अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी पाण्याखाली चांगल्या पध्दतीने शोध घेणा-या यंत्रणांचा वापर करण्याची गरज व्यक्त केली.कुंदन भंडारीला न्यायालयीन कोठडीकळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला वाहनचालक कुंदन भंडारी यास सोमवार, १९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचबरोबर तपासातील गतीबाबत पोलिसांना विचारणा करण्यात आली. पळणीकरची कबुली वगळता बाकी पुरावे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाही.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचा छडा दोन वर्षे लागला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला पाठपुरावा व उच्च न्यायालयाचा आदेश यामुळे तपासाची चक्रे हलली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. तसेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील सुध्दा अटकेत आहे.मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या केली व इतर तिघांच्या मदतीने वसई खाडीत मृतदेहाची विल्हेवाट लावली असा भांडाफोड महेश पळणीकरने केला. न्यायालयाच्या परवानगीने २७ फेब्रुवारीला कुरुंदकर याची पोलिसांनी ११ ते ४ या दरम्यान चौकशी केल्याचे समजते.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा - मुख्यमंत्र्यांना निवेदनयाप्रकरणी ज्येष्ठ सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना कोल्हापूरच्या प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी दिले.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या