स्वत:ला देवाचा अवतार आणि भूतकाळाचा जाणकार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांच्या शोषणाचे एकामागून एक प्रकरण समोर येऊ लागले आहेत. कौटुंबिक वादाने त्रस्त असलेल्या एका विवाहितेने धार्मिक विधी आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरगुती वादांमुळे मानसिक तणावात असताना उपायासाठी खरातकडे गेली. याचा फायदा घेत खरातने तिला, "तू तुझ्या मागील जन्मातील अप्सरा आहेस आणि तुझा घटस्फोट होणे आधीच निश्चित आहे, " असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर धार्मिक विधी आणि भविष्यातील संकटांची भीती घालून खरातने या महिलेवर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली असता खरातने तिला आपल्या कार्यालयात बोलावून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर खरातने त्या महिलेची मानसिक फसवणूकही केली. "माझ्या नशिबात दोन लग्ने असून तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सुखी ठेवीन," असे त्याने खोटे आश्वासन खरातने पीडितेला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
अशोक खरातच्या या कृत्यामुळे नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होत असल्याने या प्रकरणात अजून किती महिलांची फसवणूक झाली आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सरकारवाडा पोलिसांकडून सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अशोक खरात याच्याकडून महिलांच्या झालेल्या शोषणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटले आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून खरातने स्वतःच्या तथाकथित आध्यात्मिक अधिकाराचा गैरवापर करून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. हा महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न असून अशा गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घातले जाणार नाही."
Web Summary : Ashok Kharat, claiming divine powers, faces new accusations of exploiting women. A married woman filed a police complaint alleging sexual abuse under the guise of religious rituals. Kharat convinced her she was an 'Apsara' in a past life, exploiting her vulnerabilities. Police are investigating multiple cases against him.
Web Summary : अशोक खरात, जो दिव्य शक्तियों का दावा करते हैं, पर महिलाओं के शोषण के नए आरोप लगे हैं। एक विवाहित महिला ने धार्मिक अनुष्ठानों के नाम पर यौन शोषण का आरोप लगाते हुए पुलिस में शिकायत दर्ज कराई। खरात ने उसे विश्वास दिलाया कि वह पिछले जन्म में एक 'अप्सरा' थी, और उसकी कमजोरियों का फायदा उठाया। पुलिस उसके खिलाफ कई मामलों की जांच कर रही है।