अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून सातत्याने धक्कादायक माहिती समोर येत आहे. आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना अशोक खरातने कसे जाळ्यात ओढले, तसेच कुठलीही बळजबरी न करता त्यांना आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कसे काय तयार केले, असा प्रश्न हे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्वसामान्यांपासून ते या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांपर्यंत सर्वांना पडला होता. दरम्यान, याबाबत आता अशोक खरात यानेच एसआयटीसमोर माहिती दिली आहे.
एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए म्हणत अशोक खरात याने त्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चमत्कार दाखवून किंवा वशीकरण करून नव्हे तर हातचलाखी करून आपण महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं अशोक खरातने कबूल केलं आहे. तसेच ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात, ती खरी तर हातचलाखी असल्याचे अशोक खरातने सांगितले आहे.
दरम्यान, अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. खरात याने अनेक ठिकाणचे भूखंड हडपण्यासह अवैधरीत्या अनेक मालमत्तादेखील खरेदी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी खरातची कोठडी मिळवून चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. खरातच्या मालमत्तांवर ईडीचे अधिकारी लवकरच छापेमारीदेखील करणार असल्याची माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली आहे.
तसेच खरातच्या नाशिकमधील कार्यालयासह ‘तृप्तबाला’ बंगल्यातून शेकडो आधार कार्ड तसेच पॅन कार्ड एसआयटीने जप्त केले आहेत. खरातने या माध्यमातून आर्थिक व्यवहाराचे मोठे जाळे उभे केले होते. बनावट अकाऊंट नंबर तसेच पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांवर स्वत:ला नॉमिनी लावून खरातने करामती केल्याचे उघड झाले. अनेक खात्यांना मोबाइल लिंक आहे. खरात या आधार, पॅन कार्डचा वापर बनावट बँक खाते उघडण्यासाठी करत असे. प्राथमिक तपासात १३१ बनावट खाती पतसंस्थांमध्ये आढळून आली असली, तरी आहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यांत अजून काही बनावट खाती खरातने उघडल्याचा संशय आहे.
Web Summary : Astrologer Ashok Kharat admitted to sexually exploiting women using trickery, not magic. He confessed to taking advantage of women who came to him for help. ED is investigating his financial irregularities and property acquisitions. Hundreds of IDs were seized from his properties, revealing a network of fake accounts.
Web Summary : ज्योतिषी अशोक खराट ने माना कि उसने जादू नहीं, बल्कि चाल से महिलाओं का यौन शोषण किया। उसने मदद के लिए आने वाली महिलाओं का फायदा उठाया। ईडी उसकी वित्तीय अनियमितताओं और संपत्ति अधिग्रहण की जांच कर रही है। उसकी संपत्तियों से सैकड़ों आईडी जब्त किए गए, जिससे फर्जी खातों का नेटवर्क सामने आया।