शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्र खड्ड्यात, अशोक चव्हाण यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 19:38 IST

संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

परभणी -  संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनंघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा  दौरा केला आहे व सध्या ते जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा व दुष्काळ पाहणी दौ-यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. आज परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून जनसंघर्ष सभा आटोपून सेलूच्या दिशेने जात असताना त्यांनी व त्यांच्यासोबत जनसंघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खड्डा, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील खड्डा असे नामकरण करून खड्ड्यात त्यांच्या नावाचे फलक लावले.  

यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, या संपूर्ण भागात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. गावखेड्यापासून शहरांपर्यंत सगळ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील वारंवार खड्डेमुक्तीच्या तारखा जाहीर करतात पण राज्यातील रस्त्यावरील खड्डे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. खड्डे मुक्तीसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत पण खड्डे तसेच आहेत. राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महाराष्ट्र असो सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र खड्डयात गेला आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणparabhaniपरभणी