शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घरदार, शेतांवर नांगर फिरवून विकास नको, नाणारमध्ये अशोक चव्हाणांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:48 IST

घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. 

नाणार (रत्नागिरी) - घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. नाणार येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, नाणारमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारकडून इंग्रजांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरू आहे. घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको."नाणारबाबत शिवसेना आणि भाजपाचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा असे नाटक सुरू असल्याचा टोलही त्यांनी लगावला, ते म्हणाले,"अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगून शिवसेनेला तोंडघशी पाडले. सत्तेमध्ये शिवसेनेची अवस्था एवढी वाईट झाली असतानाही शिवसेना सत्तेत आहे. खरंतर अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. मात्र सुभाष देसाई घोषणा करून १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप अधिसूचना रद्द झालेली नाही."गुजराती लोकांच्या सत्ताधाऱ्यांशी असलेल्या साट्यालोट्यावरही चव्हाण यांनी टीका केली. "सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्ष नाणारवासीयांसोबत मिळून हा लढा लढणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे  काँग्रेस पक्ष लोकांसोबत राहणार आहे. या रिफायनरीच्या माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.  पण कोकणी जनता हे सरकार उद्ध्वस्त करेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी