शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२ जागा गमावल्या, १ नवी जागा मिळवली आणि १ नवा मित्र जोडला; आशिष शेलारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:17 IST

सत्यजित तांबे यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. पण शेलारांनी वेगळेच मत मांडले.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांचे निकाल लागले असून या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. त्यात नाशिकमध्ये भाजपानं कुठलाही अधिकृत उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

त्यात भाजपा नेते आशिष शेलार यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिलेत का असा प्रश्न उभा राहतो. विधान परिषदेच्या निकालावर आशिष शेलार म्हणाले की, या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं २ जागा गमावल्या, १ नवीन जागा मिळवली तर एक नवा मित्र जोडला किंवा जोडला जाईल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्या निकालावरून भाष्य केले आहे. त्याचसोबत ज्या २ जागा गेल्या त्याचे चिंतन केले पाहिजे. प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले. 

भाजपा कुठलीही ऑफर देणार नाहीसत्यजित तांबे यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. सत्यजित तांबे यांना जर भाजपात यायचं असं वाटेत असेल तर आम्ही त्यांना अडवणार नाही. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत जो निर्णय झाला तो स्थानिक नेत्यांनी घेतला. आम्ही काही खेळी केली नाही आणि खेळी फसली नाही. या जागेवर आतापासून ५ वर्ष मेहनत घ्यावी लागेल, वेळेवर ३-४ महिन्यापूर्वी या निवडणुका लढण्यास तयार नसतो. राजेंद्र विखेंनी निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह आला परंतु ते तयार नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशी भूमिका पक्षाने घेतली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

सत्यजित तांबे यांची भूमिका गुलदस्त्यातसत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सत्यजित तांबे यांच्या वडिलांना काँग्रेसनं अधिकृत तिकीट देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला. त्यामुळे काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. आता सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते भाजपात प्रवेश करतील का याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता येत्या ४ तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं सांगत त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSatyajit Tambeसत्यजित तांबेBJPभाजपा