शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 14:06 IST

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात.

पुणे -  महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीचं ओढ सर्व पांडुरंगाच्या भक्तांना लागून राहिली आहे. यंदा 12 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. शेगावहून गजानन महाराजांची पालखी निघाली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताई यांच्या पालख्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. अवघ्या वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 24 जून रोजी संत तुकाराम महाराज आणि 25 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. 

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक 

मंगळवार,  २५  जून २०१९   श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजतागांधीवाडा - आळंदी ( पालखीचा मुक्काम ) 

बुधवार , २६ जून २०१९थोरल्या पादुका ( आरती ) भोसरी फाटा (सकाळचा विसावा ) फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य ) वाकडेवाडी ( दुपारचा विसावा ) पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम ) 

गुरुवार , २७ जून २०१९पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ , पुणे ( रात्रीचा मुक्काम ) 

शुक्रवार , २८ जून  २०१९ शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा ) हडपसर ( दुपारचा नैवेद्य ) १ ) उरूळी देवाची , २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा ) सासवड ( रात्रीचा मुक्काम ) 

शनिवार , २९  जून  २०१९सासवड ( रात्रीचा मुक्काम )

रविवार , ३०  जून  २०१९बोरवके मळा ( सकाळचा विसावा ) यमाई - शिवरी ( दुपारचा नैवेद्य ) साकुर्डे ( दुपारचा विसावा ) जेजुरी ( रात्रीचा मुक्काम ) 

सोमवार , १ जुलै  २०१९१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा ) वाल्हे ( दुपारचा नैवेद्य ) वाल्हे ( रात्रीचा मुक्काम ) 

मंगळवार , २ जुलै  २०१९पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा ) नीरा ( दुपारचा नैवेद्य ) श्रींचे नीरास्नान ( दुपारचा विसावा ) लोणंद ( रात्रीचा मुक्काम ) 

बुधवार , ३ जुलै  २०१९लोणंद ( दुपारचा नैवेद्य ) चांदोबाचा लिंब - उभे रिंगण - १ ( दुपारचा विसावा ) तरडगाव ( रात्रीचा मुक्काम ) 

गुरुवार , ४ जुलै  २०१९१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा ) निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य ) वडजल ( दुपारचा विसावा ) फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम ) 

शुक्रवार  , ५ जुलै  २०१९विडणी ( सकाळचा विसावा ) पिंपरद ( दुपारचा नैवेद्य ) निंबळक फाटा ( दुपारचा विसावा ) बरड ( रात्रीचा मुक्काम ) 

शनिवार , ६ जुलै  २०१९ साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा ) धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य ) शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा ) नातेपुते ( रात्रीचा मुक्काम) 

रविवार , ०७ जुलै २०१९मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य ) १ ) सदाशिवनगर - गोलरिंगण - १ , २ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा ) माळशिरस ( रात्रीचा मुक्काम ) 

सोमवार , ०८ जुलै  २०१९खुडुस फाटा - गोल रिंगण - २ ( सकाळचा विसावा ) विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य ) धावा - बावी माऊंट ( दुपारचा विसावा ) वेळापूर ( रात्रीचा मुक्काम ) 

मंगळवार , ०९ जुलै  २०१९ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण - ३ ( सकाळचा विसावा ) तोंडले - बोंडले ( दुपारचा नैवेद्य ) टप्पा ( दुपारचा विसावा ) भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार , १० जुलै २०१९भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य ) बाजीरावाची विहिर - उभे रिंगण - २ , गोल रिंगण - ४ ( दुपारचा विसावा ) वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार  , ११ जुलै २०१९वाखरी ( दुपारचा नैवेद्य ) पादुकेजवळ उभे रिंगण - ३ - आरती ( दुपारचा विसावा ) पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार , १२ जुलै २०१९भागवत एकादशी , आषाढी यात्रा पंढरपूरदुपारी - श्रींचे चंद्रभागा स्नान  

मंगळवार,  १६ जुलै २०१९श्रींचे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट 

बुधवार - १७ जुलै २०१९माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAlandiआळंदीPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी