आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:33 IST2026-04-12T14:30:48+5:302026-04-12T14:33:45+5:30

त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती आणि रिकाम्या वेळात त्या आवर्जून किचनमध्ये वेळ घालवत. विशेषतः, मिर्चीचे लोनचे त्या अतिशय सुंदर बनवत. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले 'मिरचीचे लोणचे' त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात अत्यंत आवडीचे होते.

Asha Tai's favorite food was 'dal-bhaat', her own homemade chilli pickle; Along with her voice, her simple lifestyle also won the hearts of her fans | आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं

आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं


भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वातील एका महान युगाचा अंत झाला आहे. त्यानी केवळ आपल्या अष्टपैलू आवाजानेच नव्हे, तर आपल्या साध्या जीवनशैलीनेही कोट्यवधींच्या हृदयात स्थान मिळवले होते.

जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या आशा ताईं यांची सादी जीवनशैली आणि खाणपाणाची पसंतही लोकांना आकर्षित करणारी होती. त्यांना अत्यंत साधे अन्न अवडत. जगभरातील विविध व्यंजनांचा आस्वाद घेतल्यानंतरही, त्यांच्या मनाला नेहमी घरच्या साध्या जेवणाची ओढ असायची. 'डाळ-भात' हा त्यांचा सर्वात आवडता पदार्थ होता. परदेश दौरे आणि व्यस्त वेळापत्रकातही त्या कायमच आपल्या मुळांशी जोडलेल्या राहिल्या. 

त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती आणि रिकाम्या वेळात त्या आवर्जून किचनमध्ये वेळ घालवत. विशेषतः, मिर्चीचे लोनचे त्या अतिशय सुंदर बनवत. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले 'मिरचीचे लोणचे' त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात अत्यंत आवडीचे होते. या छोट्या छोट्या गोष्टी त्याचा साधेपणा दर्शवतात. महत्वाचे म्हणजे, मिरचीचे लोणचे आणि डाळ-भात यांसारख्या साध्या साध्या गोष्टी, प्रसिद्धीच्या झगमगाटातही, त्या किती साधे जीवन जगत होत्या हे दर्शवतात.

आशा ताईंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक रेस्टॉरंट्स सुरू केले आणि भारतीय खाद्यसंस्कृतीला एक ओळख मिळवून दिली. मात्र त्यांची वैयक्तिक पसंती नेहमी साधेपणालाच राहिली. विज्ञानाच्या दृष्टीनेही डाळ-भात हे एक संतुलित आणि पौष्टिक जेवण मानले जाते. डाळ प्रथिनांचा (प्रोटीन) उत्तम स्त्रोत आहे, तर भातातून कार्बोहायड्रेट्स मिळतात. हे पचायला हलके असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते. त्यांच्या आवाजातील जादू आणि साधेपणाची ही आठवण चाहत्यांना नेहमीच स्मरणात राहील.

 

Web Title : आशा भोसले का 'दाल-भात' प्रेम और सादा जीवन।

Web Summary : महान गायिका आशा भोसले, 92 वर्ष की आयु में निधन हो गया। वैश्विक प्रसिद्धि और रेस्तरां के बावजूद, उन्होंने 'दाल-भात' और घर के बने मिर्च के अचार जैसे साधारण भोजन को पसंद किया, जो उनके सरल स्वभाव को दर्शाता है। उनकी सादगी प्रशंसकों को पसंद आई।

Web Title : Asha Bhosle's love for 'Daal-Bhaat' and simple living.

Web Summary : Asha Bhosle, the legendary singer, passed away at 92. Despite global fame and restaurants, she cherished simple meals like 'Daal-Bhaat' and homemade chili pickle, reflecting her down-to-earth nature and healthy food choices. Her simplicity resonated with fans.