आशा गवळींना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:37 IST2018-04-25T00:37:42+5:302018-04-25T00:37:42+5:30
पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची, तपासाला सहकार्य करायचे, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही

आशा गवळींना अटकपूर्व जामीन
पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल प्रकरणात कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी आशा ऊर्फ मम्मी गवळी यांना खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची, तपासाला सहकार्य करायचे, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यायचा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजारांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबत चंदननगर येथील एका व्यापाºयाने फिर्याद दिली आहे.