ओवेसी राखतात सुरक्षित अंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:03 PM2019-04-09T12:03:15+5:302019-04-09T12:04:05+5:30

वादग्रस्त वक्तव्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'एमआयएम'चे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हे फोटो ओवेसी यांच्यातील एक गुण दाखवणारे आहेत.

Asaduddin Owaisi maintains safe distance while meeting ladies | ओवेसी राखतात सुरक्षित अंतर...

ओवेसी राखतात सुरक्षित अंतर...

googlenewsNext

मुंबई - एप्रिल महिन्यातील उन्ह तापत असताना लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू आहे. तर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. यामध्ये सोशल मीडियाची मदत घेताना राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. फेसबुकवर विविध नेत्यांचे वादग्रस्त फोटो आणि वक्तव्य व्हायरल होत असताना काही नेत्यांचे चांगले कामं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'एमआयएम'चे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हे फोटो ओवेसी यांच्यातील एक गुण दाखवणारे आहेत. अनेकदा राजकीय नेते महिलांसोबत फोटो घेताना महिलांशी अंगलट करताना दिसले आहेत. तर अनेक नेत्यांनी महिलांचा हात हातात घेऊन काढलेले सोशल मीडियावर अनेक नेते दिसले आहेत. परंतु, असदुद्दीन ओवेसी यांनी एक नवीन आदर्श घालून दिल्याचे व्हायरल फोटोतून दिसून येते.

ओवेसी यांचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. यामध्ये ते महिलांसोबत फोटो काढताना दिसून येत आहेत. मात्र ओवेसी फोटो काढताना महिलांपासून सुरक्षीत अंतर ठेवून उभे असल्याचे दिसतात. तसेच फोटो घेताना ओवेसी अंग चोरताना दिसत आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नेत्यांसंदर्भात व्हायरल झालेल्या कंटेन्ट, फोटो आणि व्हिडिओला महत्त्व प्राप्त होत आहे.

Web Title: Asaduddin Owaisi maintains safe distance while meeting ladies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.