शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

INDIA आघाडीचे केंद्रबिंदू शरद पवार, म्हणूनच...; जयंत पाटलांचा भाजपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:10 IST

शरद पवारांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राजकारण केले आहे. राज्यातील जनतेने नेहमी शरद पवारांची पाठराखण केली. इतर सर्व पक्षातील नेत्यांना शरद पवार काय करू शकतात हे माहिती आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

मुंबई - Jayant Patil on Sharad Pawar ( Marathi Newsशरद पवारांचा दिल्लीत दबदबा असल्याने त्यांचा पक्ष फोडल्याची शक्यता आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होती.शरद पवारांना सगळेच मानतात. प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध शरद पवारांचे आहे. शरद पवार सगळ्यांना जोडू शकतात. त्यामुळे इंडिया आघाडीचे मुख्य केंद्रबिंदू शरद पवार आहेत. लोक त्यांच्या संपर्कात राहतात. या राहुल गांधींचीही भूमिका आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पडती भूमिका घेऊनही लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. अनेक पाणी पुलाखालून जायचे आहे असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 

खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांनी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राजकारण केले आहे. राज्यातील जनतेने नेहमी शरद पवारांची पाठराखण केली. इतर सर्व पक्षातील नेत्यांना शरद पवार काय करू शकतात हे माहिती आहे. त्यामुळे लोकं त्यांच्याविषयी अंदाज बांधत असतात. मराठवाडा विद्यापीठाला काहीही झाले तरी बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला. देशात महिलांना आरक्षण हे शरद पवारांनी दिले.परिवर्तनाची पाऊले शरद पवार ओळखतात आणि निर्णय घेतात. शाहू फुले आंबेडकर यांची बहुजन समाजाची मानसिकता त्यांच्या शरद पवारांच्या मनात आहे. त्यामुळे बहुजन समाजाच्या हितासाठी ते कायम पुढाकार घेतात. मी शरद पवारांसोबत अनेक वर्ष काम केलंय, ते खूप संवेदनशील नेते आहेत. महाराष्ट्रात काहीही झाले तरी पहिल्यांदा तिथे पोहचले पाहिजे अशी त्यांची भावना असते. मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये भूकंप झाला तेव्हा ते पहाटे तिथे गेले होते.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला तेव्हा शरद पवार पहिल्यांदा तिथे गेले. पूर आला शरद पवार गेले. राज्यात कुठेही काहीही घडले तरी महाराष्ट्र हा त्यांचा मतदारसंघ आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही झाले तरी ते अस्वस्थ होतात असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करण्याचं पाऊल शरद पवारांनी घेतले. आज उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने काम करताय. शरद पवार जे करतात ते सगळ्यांना बोलावून करतात. प्रत्येक निर्णय सर्वानुमते घेण्याचा निर्णय करतात. एखादी गोष्ट करायची नसेल तर ते नाहीच करत. आमच्या पक्षात काहींनी भाजपासोबत जाण्याची भूमिका मांडली. परंतु शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला. पक्ष फुटला तरी शरद पवारांनी आपली भूमिका बदलली नाही. २५ वर्ष आम्हाला पूर्ण झाली पण दुर्दैवाने फूट पडली. ते सगळ्यांशी बोलत असतात. शरद पवारांना हवं असते तेच करते. आपण २०२४ चा विचार करत असून परंतु शरद पवार २०३४ च्या निवडणुकीच्या गणिताचा विचार करतात. त्यांचे वय झाले बोलले जाते.परंतु इतरांपेक्षा त्यांचे ब्रेन अधिक काम करते. चटकन गोष्टी कळतात. ते राजकारणात तथ्य पाळणारे आहे. यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आहे. त्यामुळे सुसंस्कृत राजकारण ते करतात. सगळ्यांचे ऐकणं आणि त्यांना पाहिजे तेच करणे हे शरद पवारांचे राजकारण आहे. तडजोड न करता राजकारण करणारा नेता म्हणजे शरद पवार आहेत. त्यांच्यावर कुणी कितीही दबाव आणला तरी ते झुकत नाही. आज शरद पवार माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळले नाहीत. काय आवडणार आणि काय नाही हेदेखील कळत असते असंही जयंत पाटील म्हणाले.  

"शरद पवारांना कल्पना नसताना सगळं घडलं"

दरम्यान, मी साक्षीदार आहे, आपल्याला भाजपासोबत गेले पाहिजे असा आग्रह धरणारा एक गट आमच्या पक्षात होता. सतत ते आग्रह करत होते. परंतु शरद पवार त्याला होकार देत नव्हते. फारच दबाव आला तर बघा, इतरांशी बोला असं बोलून ते वेळ मारून न्यायचे. पण त्यांच्या मनात कधीही भाजपासोबत जाण्याचे नव्हते. त्यामुळे ही घडलेली घटना अचानक घडली, शरद पवारांना याची कुठेही कल्पना नव्हती. पहिल्यांदा जेव्हा हे घडलं. तेव्हा ८-९ आमदार गेले, त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष बदलायचे आहेत या भावनेतून अनेक आमदार तिकडे गेले. मलाही अनेकांनी फोन केला. मला विचारले तेव्हा मी जावा म्हटलं. त्यातील २-३ मंत्री आहेत. पवारांना याची कल्पना नव्हती. शरद पवारांनी स्क्रिप्ट केली असती तर निवडणूक आयोगाच्या सुनावणीत ३-३ तास एकटे जाऊन बसतात. ज्या पक्षाला आपण जन्म दिला तो हिसकावला जातोय हे उघड्या डोळ्याने ते दिल्लीत बघतायेत.स्क्रिप्टेड असते तर निवडणूक आयोगात सुनावणी घडली नसती. ही घटना शरद पवारांच्या जिव्हारी लागलीय की त्यांचा पक्ष त्यांच्या हातून जातोय. म्हणून ते स्वत: दिल्लीला जातात. आयोगात सुनावणीला जाऊन बसतात. वकिलांची चर्चा करतात. हे स्किप्टेड असते तर या गोष्टी घडल्या नसत्या. शरद पवारांना निवडणूक आयोगाच्या दारात जायला लावणे हे अभिप्रेत नव्हते.परंतु आज त्यांना जावे लागतंय हे फार वाईट गोष्ट आहे अशी खंत जयंत पाटलांनी बोलून दाखवली.

शरद पवारांबद्दल राज्यात सहानुभूती

प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील तरुणवर्ग, महिला वर्ग हा शरद पवार कुठेही गेले तरी त्यांना भेटायला जातो. या वयात हा नेता लढतोय. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकवायचा नाही. मराठी माणसाचा स्वाभिमानासाठी आणि चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी शरद पवार लढतायेत. त्यामुळे त्यांची क्रेझ वाढली आहे. राज्यात कुठेही गेले तरी त्यांचे समर्थन करणारी जनता दिसते. पक्षफुटीनंतर शरद पवारांबाबत सहानुभूती लोकांमध्ये आहे. ती दौऱ्यात दिसते. शरद पवारांचा आज उत्साह प्रचंड आहे. कामाचा हुरूप आहे. कोणत्याही घटनेत कसे वागले पाहिजे हे शरद पवारांकडून आम्ही शिकलोय. शरद पवारांना समर्थन द्यायला लोक मोठ्या संख्येने आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस