मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५,१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तिपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५,१२२ एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील.
शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येईल.
मुख्य कार्यक्रम ४ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे. पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तिपत्रे वितरित करतील. नाेकरी मिळणार असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
विभागनिहाय नोकऱ्या एकूण १०,३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३,०७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून, २,५९७ हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात १,६७४, नाशिक विभागात १,२५०, तर मराठवाड्यातील १,७२० उमेदवार आहेत.
Web Summary : Maharashtra will issue appointment letters to 5,187 heirs of deceased government employees on October 4th. Simultaneously, 5,122 MPSC appointees will receive certificates, bringing over 10,000 new employees into government service on the same day, thanks to CM's initiative.
Web Summary : महाराष्ट्र सरकार 4 अक्टूबर को 5,187 मृतक सरकारी कर्मचारियों के उत्तराधिकारियों को नियुक्ति पत्र जारी करेगी। साथ ही, 5,122 एमपीएससी नियुक्तियों को प्रमाण पत्र मिलेंगे, जिससे मुख्यमंत्री की पहल के कारण एक ही दिन में 10,000 से अधिक नए कर्मचारी सरकारी सेवा में शामिल होंगे।