भाऊ उपसरपंच झाला म्हणून पठ्ठ्याने हेलिकॉप्टरमधून गावात मारला फेरफटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 09:03 IST2023-12-03T09:03:00+5:302023-12-03T09:03:33+5:30
साहेबराव खिलारी यांची करगणी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली. धाकटा भाऊ अंकुश याला खूप आनंद झाला.

भाऊ उपसरपंच झाला म्हणून पठ्ठ्याने हेलिकॉप्टरमधून गावात मारला फेरफटका
आटपाडी (जि. सांगली) : भाऊ आपला गावचा उपसरपंच झाल्याने धाकट्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. २० वर्षांपूर्वी केलेला ‘प्रण’ लक्षात होता. त्यानुसार थेट हेलिकॉप्टरमधून गावाला रपेट मारत ग्रामदेवतेला प्रदक्षिणा घालत त्याने आपला आनंद व्यक्त केला. आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील याची चर्चा रंगली आहे.
साहेबराव खिलारी यांची करगणी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली. धाकटा भाऊ अंकुश याला खूप आनंद झाला. आपल्या कुटुंबीयांनी गावच्या उपसरपंचपदाचे पाहिलेले कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याने साजरा केला.
प्रण केला पूर्ण
२० वर्षांपूर्वी अंकुश खिलारी यांचे चुलते दुर्योधन खिलारी यांची राजकीय डावपेचातून पदाची संधी हुकली होती. त्यावेळी अंकुश यांनी कुटुंबातील सदस्य गावचा सरपंच, उपसरपंच झाल्यास गावाला, ग्रामदैवत मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणेचा प्रण केला होता.