अरुण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक गमावला : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 11:10 IST2017-09-25T10:39:51+5:302017-09-25T11:10:17+5:30
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे.

अरुण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक गमावला : मुख्यमंत्री
मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या श्री. साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालिन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या श्री. साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
अनेक प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देणारे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक श्री अरुण साधू यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2017
समकालिन वास्तव, महानगरांमधील व्यथा त्यांनी आपल्या लेखणीतून मांडल्या होत्या.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2017
पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, समृद्ध केल्या.