अरुण गवळीला पॅरोल मंजूर

By Admin | Updated: October 18, 2016 05:21 IST2016-10-18T05:21:07+5:302016-10-18T05:21:07+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला २१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे.

Arun Gawli sanctioned parole | अरुण गवळीला पॅरोल मंजूर

अरुण गवळीला पॅरोल मंजूर


नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला २१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे. गवळीच्या आजारी पत्नीवर २५ आॅक्टोबर रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्याला रजा देण्यात आली आहे.
गवळीला शुक्रवारी दुपारपर्यंत सोडण्यास सांगण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी रजेचा अर्ज नाकारल्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका अंशत: मंजूर करण्यात आली आहे. गवळीच्या पत्नीच्या गर्भाशयात गाठ आहे.
त्यांना शनिवारी रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arun Gawli sanctioned parole