अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

By Admin | Updated: April 28, 2015 01:27 IST2015-04-28T01:27:45+5:302015-04-28T01:27:45+5:30

कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीने मुलाच्या लग्नासाठी ३० दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Arun Gawli parole in High Court | अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीने मुलाच्या लग्नासाठी ३० दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्यासमोर बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
अरुण गवळीचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न आहे. गवळीची सून नागपुरातील असून, ती पदवीचे शिक्षण घेत आहे. गवळीला काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता. परंतु त्यांनी २३ एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे़ विभागीय आयुक्तांनी सारासार विचार न करता पॅरोलचा अर्ज फेटाळला. त्यांनी दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली़ पण कोणता गुन्हा घडेल याबाबत काहीच स्पष्ट केले नाही. गवळीची वागणूक चांगली असून, तो शांततेत शिक्षा भोगत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक जामसंडेकर हत्याप्रकरणात गवळीला शिक्षा झाली आहे.

Web Title: Arun Gawli parole in High Court