पोलादपूर, महाडमध्ये पावसाचे आगमन
By Admin | Updated: June 11, 2016 03:29 IST2016-06-11T03:29:50+5:302016-06-11T03:29:50+5:30
रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.

पोलादपूर, महाडमध्ये पावसाचे आगमन
महाड/ पोलादपूर : रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे येथील नागरिकांची काही काळ उकाड्यापासून सुटका झाली आहे. पावसाने अशीच हजेरी लावली तर पाणीटंचाईचे संकट दूर होऊन शेतकऱ्यालाही फायदा होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महाड शहरासह रायगड व दासगांव विभागाला अनेक गावांनी पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्याने या गावांसह महाड शहरातही पाणी टंचाई निर्माण झाली होती. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने कोथुर्डे धरणात पाण्याचा साठा होईल. गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे महाडकर चिंतेत होते. पाऊस येणार असल्याने शेतकरीवर्ग देखील सुखावला आहे. पोलादपूर तालुक्यात पितलवाडी विभागात ढवळे, कामथे, सावित्री खोऱ्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. (वार्ताहर)