कांदिवलीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: September 23, 2014 05:20 IST2014-09-23T05:20:51+5:302014-09-23T05:20:51+5:30

त्तर प्रदेश पोलिसांवर हल्ला करून पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने कांदिवली येथून अटक केली

Arrested attacker of Kandivli police | कांदिवलीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास अटक

कांदिवलीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास अटक

मुंबई : उत्तर प्रदेश पोलिसांवर हल्ला करून पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने कांदिवली येथून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
अरुण राय ऊर्फ ठाकूर (३४) असे या आरोपीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील आझमगड येथील राहणारा आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने एका नेत्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवल्याने त्यांनी पोलिसांवरच गोळीबार करून पळ काढला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. मात्र या आरोपीने तिथून पळ काढत मुंबई गाठली. गेल्या दोन महिन्यांपासून तो अरुण ठाकूर या नावानेच मुंबईत राहत होता. या आरोपीबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी कांदिवलीतील लालजी पाडा परिसरात सापळा रचला.
दरम्यान सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला कांदिवली परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळ ७.६५ बोअरची एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानुसार कांदिवली पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Arrested attacker of Kandivli police