राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमधील क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणींत मोठी वाढ झाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्यानंतर आज नाशिक कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याने लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही रद्द होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आशुतोष राठोड यांनी दिले आहेत. मात्र या प्रकरणी दिलासा मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच प्रकृती अस्वस्थ्यामुळे माणिकराव कोकाटे हे उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरले. फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आलं आहे.
Web Summary : Maharashtra Minister Manikrao Kokate faces arrest after a court issued a warrant in connection with a housing scam case. A previous conviction and prison sentence could also lead to the loss of his MLA status. He is reportedly seeking relief in the High Court.
Web Summary : महाराष्ट्र के मंत्री माणिकराव कोकाटे को हाउसिंग घोटाले के मामले में अदालत द्वारा वारंट जारी करने के बाद गिरफ्तारी का सामना करना पड़ रहा है। पिछली सजा के कारण उनकी विधायक सदस्यता भी खतरे में पड़ सकती है। बताया जा रहा है कि वह उच्च न्यायालय में राहत की मांग कर रहे हैं।